हिंदू गोमांस न खाताच निघून गेले !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बी.एन्.पी.) हिच्या वतीने सिलहट येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काही पत्रकारदेखील उपस्थित होते. यांपैकी अनेकजण हिंदू होते. या वेळी इफ्तारसाठी वाढण्यात आलेल्या ताटात सर्वांना खाण्यासाठी गोमांस देण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी इफ्तारमधील पदार्थांमध्ये गोमांसाखेरीज इतर कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता. यामुळे इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झालेले हिंदु कार्यकर्ते आणि पत्रकार काहीही न खाताच निघून गेले. या घटनेविषयी बी.एन्.पी.च्या हिंदु कार्यकर्त्यांनी आणि उपस्थित पत्रकारांनी झालेल्या प्रकाराविषयी सामाजिक माध्यमांतून संताप व्यक्त केला. तसेच आयोजकांचा आणि निमंत्रण देणार्यांचा निषेध केला.
Bangladesh Nationalist Party (BNP) is at the centre of a controversy for hosting an iftar meal in Sylhet for Hindu participants with a plater including beef
(@hasankhokonsahi) #Bangladesh #Iftar https://t.co/5byXQ2KOfo
— IndiaToday (@IndiaToday) April 30, 2022
१. बी.एन्.पी.चे स्थानिक कार्यकर्ते मंटू नाथ यांनी सामाजिक माध्यमांवर लिहिले, ‘इफ्तार पार्टीत गोमांसाखेरीज खाण्यासाठी इतर कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने माझ्यासह इतर २० हिंदु सहकार्यांना उपाशी रहावे लागले. आम्ही केवळ सर्व मुसलमान नेते आणि कार्यकर्ते यांना उपवास सोडतांना पहात होतो.’
२. बी.एन्.पी.च्या विद्यार्थी संघटनेचे स्थानिक नेते कनक कांती दास म्हणाले की, यासाठी कुणी क्षमाही मागितली नाही. (याचा अर्थ हे जाणीवर्पूवक करण्यात आले, हेच स्पष्ट होते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)