Menu Close

डेहराडून (उत्तराखंड) येथे हनुमान चालिसाचे पठण करून परतणार्‍या तरुणांवर धर्मांधांचे आक्रमण

 

डेहराडून (उत्तराखंड) – येथील शीशमहल भागात हनुमान चालिसाचे पठण करून परतणार्‍या तिघा हिंदूंना मारहाण करण्यात आली. हे तरुण येथे ऊसाचा रस पिण्यासाठी थांबले असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली.

१. हिंदु तरुण ऊसाचा रस पित असतांना मोठ्या संख्येने धर्मांध तरुण दुचाकींवरून तेथे आले आणि या तरुणांच्या गळ्यातील भगवे उपरणे पकडून ‘तुम्ही बजरंग दलाचे सदस्य आहेत का ?’ अशी विचारणा करत त्यांना मारहाण केली. या वेळी हिंदु तरुणांनी विरोध केला असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. याची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी येथून तिघा धर्मांधांना पकडले.

२. प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, दगडफेकीनंतर धर्मांधांपैकी एकाने दूरभाष केल्यानंतर काही मिनिटांतच ५० ते ६० धर्मांध तेथे आले आणि त्यांनी दगडफेक चालू केली. या धर्मांधांकडे धारदार शस्त्रे, लाठ्या काठ्या होत्या. तसेच गावठी पिस्तुले होती. त्यांनी स्थानिकांनी पकडलेल्या ३ धर्मांधांपैकी दोघा धर्मांधांची सुटका केली आणि पळून गेले. स्थानिकांनी तिसर्‍या धर्मांधाला एका दुकानात कोंडून ठेवले होते. नंतर त्याला पोलिसांकडे सोपवले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *