Menu Close

मांद्रे येथे ‘सनबर्न’ महोत्सव नको ! – जीत आरोलकर, आमदार, मगोप

जीत आरोलकर, आमदार, मगोप

पेडणे – सतत वादग्रस्त राहिलेला आणि वर्षातून ५ दिवस चालणारा ‘सनबर्न’ सारखा स्थानिकांना डोकेदुखी ठरणारा महोत्सव मांद्रे येथे आणू नये. अशा महोत्सवांना माझा ठाम विरोध आहे, अशी माहिती आमदार जीत आरोलकर यांनी येथे पत्रकारांंना दिली.

(सौजन्य : Goan Reporter News) 

ते पुढे म्हणाले, ‘‘मांद्रे मतदारसंघाच्या विकासासाठी वर्षभर चालणार्‍या समाजोपयोगी उपक्रमांची आवश्यकता आहे. केवळ ५ दिवस चालणारे आणि जनतेला त्रासदायक ठरणारे महोत्सव येथे नकोत.’’ गेली अनेक वर्षी ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने गोव्यात ‘सनबर्न’ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात अमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर आमदार जीत आरोलकर यांनी अशी भूमिका घेतली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *