Menu Close

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ते, उद्योगपती आणि हिंतचिंतक यांच्या भेटीत राष्ट्र अन् धर्म या विषयावर साधला संवाद !

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचा तमिळनाडू दौरा

चेन्नई – सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी ४ ते ९ एप्रिल या कालावधीत तमिळनाडूमधील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ते, उद्योगपती, हिंतचिंतक आणि विज्ञापनदाते यांच्या भेटी घेतल्या. या वेळी श्री. राजहंस यांनी त्यांच्याशी राष्ट्र आणि धर्म या विषयावर संवाद साधला. या सर्वांना गोवा येथे होणाऱ्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रणही देण्यात आले.

श्री. चेतन राजहंस यांनी भेट घेतलेल्या हिंदुत्वनिष्ठांची नावे

भाजपचे नेते श्री. राधाकृष्णन्, नगरसेविका उमा आनंद,  हिंदु मक्कल कत्छीचे (हिंदु जनता पक्षाचे) नेते श्री. अर्जुन संपथ, ‘हिंदु युथ जागरण मंचा’चे श्री. पालासंतोष, प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. शिबी, मंदिर पुजारी सोसायटीचे टी.आर्. रमेश, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते मुथरासंजी, ‘वैदिक सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ आणि ‘श्री टीव्ही’चे श्री. बाला गौतमन्, उद्योगपती श्री. भावेश आणि ‘सनातन पंचांग’चे विज्ञापनदाते श्री. सुरेश अत्री

१. चेन्नई येथे ‘हिंदु युथ जागरण मंचा’चे श्री. पालासंतोष यांची भेट

‘हिंदु युथ जागरण मंचा’चे श्री. पालासंतोष यांची श्री. चेतन राजहंस यांनी ५ एप्रिल २०२२ या दिवशी भेट घेतली. सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीमध्ये श्री. राजहंस यांनी त्यांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने हिंदूसंघटनाचे महत्त्व विशद केले. तसेच गोवा येथे होणाऱ्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण दिले. या वेळी श्री. पालासंतोष यांनी श्री. राजहंस यांना तमिळनाडूला परत भेट देण्याची विनंती केली. तेव्हा त्यांची ‘प्राचीन मठांच्या प्रमुखांशी भेट घडवून आणण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी एका शिबिराचे आयोजित करू’, असेही ते म्हणाले.

२. चेन्नई येथे ‘सनातन पंचांग’चे विज्ञापनदाते श्री. सुरेश अत्री यांची भेट

श्री. चेतन राजहंस यांनी ६ एप्रिल या दिवशी तमिळ भाषेतील ‘सनातन पंचांग’चे विज्ञापनदाते श्री. सुरेश अत्री यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या भेटीमध्ये उभयतांमध्ये हिंदु धर्माच्या सद्यःस्थितीविषयी चर्चा झाली. श्री. राजहंस यांनी त्यांना गोवा येथे होणाऱ्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण दिले. या अधिवेशनाला सुरेश अत्री यांनीही उपस्थित रहाण्यास उत्सुकता दर्शवली.

३. चेन्नई येथे प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. शिबी यांची भेट

श्री. चेतन राजहंस यांनी ६ एप्रिल या दिवशी चेन्नई येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. शिबी यांची भेट घेतली. श्री. शिबी हे मूळ केरळचे असून प्रखर हिंदुत्वनिष्ठ आहेत. हिंदूंच्या रक्षणासाठी काहीतरी करावे, असे त्यांना वाटते. याविषयी श्री. राजहंस यांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि धर्मशिक्षण वर्गाला उपस्थित रहाण्यास सांगितले. या वेळी श्री. शिबी यांनी त्यांच्या काही मित्रांनाही सत्संगात सहभागी करून घेणार असल्याचे सांगितले.

४. चेन्नई येथील उद्योगपती श्री. भावेश यांची घेतली भेट !

चेन्नई येथील उद्योगपती श्री. भावेश यांची श्री. चेतन राजहंस यांनी ६ एप्रिल या दिवशी भेट घेतली. ते सनातनच्या तमिळ भाषेतील पंचांगाचे नियमित प्रायोजक आहेत, तसेच ते तमिळ भाषेतील ग्रंथांचे वितरणही करतात. यापूर्वी त्यांनी मुंबई येथे सेवा केली आहे. श्री. राजहंस यांनी केलेल्या मार्गदर्शनाने ते पुष्कळ प्रभावित झाले. श्री. राजहंस यांच्याशी झालेल्या संभाषणाविषयी मनोगत व्यक्त करतांना ते म्हणाले, ‘‘मी माझ्याच कुटुंबातील सदस्याशी संभाषण केले.’’ या वेळी त्यांना गोवा येथे होणाऱ्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण देण्यात आले. ही भेट सुमारे एक घंटा चालली. श्री. भावेश यांनी त्यांच्या मुंबईतील काही परिचितांशी श्री. राजहंस यांनी संपर्क साधला आणि त्यांना संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली.

टी.आर्. रमेश

५. चेन्नई येथे मंदिर पुजारी सोसायटीचे टी.आर्. रमेश यांची घेण्यात आली भेट

‘मंदिर पुजारी सोसायटी’चे श्री. टी.आर्. रमेश यांची श्री. चेतन राजहंस यांनी ७ एप्रिल २०२२ या दिवशी चेन्नई येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या वेळी त्यांच्याशी मंदिरांशी संबंधित सूत्रांवर एकत्र येण्याविषयी चर्चा झाली. त्यांना गोवा येथे होणाऱ्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण देण्यात आले.

जी. राधाकृष्णन्, भाजपचे नेते, तामिळनाडू

६. चेन्नई येथे भाजपचे नेते श्री. राधाकृष्णन् यांच्याशी भेट

भाजपचे नेते श्री. राधाकृष्णन् आणि अन्य १० हिंदुत्वनिष्ठ यांची पट्टालम् येथील अंजनेयर मंदिरात श्री. चेतन राजहंस यांनी ७ एप्रिल या दिवशी भेट घेतली. या वेळी उभयतांमध्ये हिंदु धर्माविषयी चर्चा झाली. या वेळी हिंदुत्वनिष्ठांच्या शंकानिरसन करण्यात आले.

डावीकडून पू. (सौ.) उमा रविचंद्रन आणि नगरसेविका उमा आनंद यांना भेटवस्तू देतांना श्री. चेतन राजहंस

७. चेन्नई येथील नगरसेविका उमा आनंद यांची घेण्यात आली भेट

पश्चिम माम्बलम् या मतदारसंघाच्या नगरसेविका उमा आनंद यांची श्री. चेतन राजहंस यांनी ८ एप्रिल २०२२ या दिवशी त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यांना गोवा येथे होणाऱ्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण देण्यात आले.

श्री. अर्जुन संपथ

८. हिंदु मक्कल कत्छीचे (हिंदु जनता पक्षाचे) नेते श्री. अर्जुन संपथ यांची घेतली सदिच्छा भेट !

चेन्नई येथे हिंदु मक्कल कत्छीचे नेते श्री. अर्जुन संपथ यांची श्री. चेतन राजहंस यांनी ८ एप्रिल या दिवशी भेट घेतली. सनातन संस्थेच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत श्री. संपथ यांना गोवा येथे होणाऱ्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण देण्यात आले.

डावीकडून पू. (सौ.) उमा रविचंद्रन, श्री. चेतन राजहंस यांचा सत्कार करतांना अधिवक्ता मुथरासंजी आणि सर्वांत शेवट भाजपचे नेते श्री. राधाकृष्णन्

९. चेन्नई येथे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता मुथरासंजी यांची घेतली भेट

श्री. चेतन राजहंस यांनी ८ एप्रिल या दिवशी भाजपचे नेते श्री. राधाकृष्णन् यांच्यासह  हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता मुथरासंजी आणि इतर उपस्थित होते. त्यांना गोवा येथे होणाऱ्या अधिवक्ता अधिवेशनाला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण देण्यात आले. अधिवक्ता मुथरासंजी  हिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमात सहभागी होण्याविषयी फार उत्साही होते.

श्री टीव्ही’चे श्री. बाला गौतमन्

१०. चेन्नई येथे ‘वैदिक सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ आणि ‘श्री टीव्ही’चे श्री. बाला गौतमन् यांची घेतली भेट

‘वैदिक सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ आणि ‘श्री टीव्ही’चे श्री. बाला गौतमन् यांची श्री. चेतन राजहंस यांनी ९ एप्रिल या दिवशी भेट घेतली. या वेळी त्यांना गोवा येथे होणाऱ्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण दिले. या वेळी श्री. बाला गौतमन् यांनी त्यांच्या सध्याच्या उपक्रमाविषयी आणि भविष्यातील योजनांविषयी चर्चा केली.


१. मदुराई येथे साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन

मदुराई येथे ४ एप्रिल २०२२ या दिवशी मनोन्मणी यांच्या निवासस्थानी एका सत्संगाचे आयोजन करण्यात आले. या सत्संगाला श्री. चेतन राजहंस यांनी व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा २० साधकांनी लाभ घेतला.

श्री. चेतन राजहंस

मनोन्मणी आणि त्यांचे पती श्री. सुब्रह्मण्यम् ‘एस्.एस्.आर्.एफ.’च्या मार्गदर्शनाखाली साधना करतात. या सत्संगाला कलेवणीअक्का यांच्या बहिणी प्रामुख्याने उपस्थित होत्या. त्यांची ४ कुटुंबे असून सर्वजण साप्ताहिक सत्संगात नियमित सहभागी होतात, तसेच सत्सेवाही करतात. या वेळी कार्थिग्यानी अक्का यांनी इयत्ता १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या आणि बालकांच्या सत्संगामध्ये नियमित सहभागी होणाऱ्या एका युवा साधिकेला आलेल्या अनुभूती सांगितल्या. सत्संगात उपस्थित राहिल्यानंतर तिची अभ्यासात एकाग्रता वाढली आणि निरर्थक विचार येण्याचे प्रमाण अल्प झाले. त्यामुळे तिच्या आईनेही सत्संगात उपस्थित रहाण्याची इच्छा व्यक्त केली. हा संपूर्ण सत्संग २ घंट्यांहून अधिक वेळ चालला. ‘साधनेमुळे सर्वांचे तोंडवळे प्रसन्न दिसत आहेत’, असे श्री.चेतन राजहंस यांना जाणवले.  त्यांनी उपस्थितांनी विचारलेल्या साधनेविषयी शंकांचे निरसन केले. या वेळी सर्व साधकांचा गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव जागृत झाला.

– श्री. बालाजी कोल्ला आणि सौ. सुगंधी जयकुमार, चेन्नई

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *