ठाणे – धार्मिक स्थळापासून २०० मीटर अंतरापर्यंत अवैधरित्या जमाव जमवणे, घोषणा देणे, वाद्ये वाजवणे, गायन करणे, विनाअनुमती ध्वनीवर्धक लावणे, मिरवणुका काढणे, तसेच सभा घेणे यांना ठाणे पोलिसांनी बंदी घातली आहे.
ध्वनीक्षेपकाचे साहित्य खरेदी करणार्या ग्राहकाचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक नोंद करून घेण्याची सूचनाही दुकानदारांना देण्यात आली आहे. ही बंदी २७ जूनपर्यंत असणार आहे, अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथील सार्वजनिक सभेत ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याचे आवाहन केले होते, अन्यथा मशिदींजवळच्या मंदिरांवर दुप्पट आवाजात भोंगा लावण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्या पार्श्वभूमीवर कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.
धार्मिक स्थळापासून २०० मीटर परिसरात लाऊडस्पीकर वापरास बंदी : ठाणे पोलिसांचे निर्देश #Thane @AmhiDombivlikar @ThaneKalyanDAB https://t.co/ylDVKYyNGz
— महामुंबई मंथन | MahaMumbai Manthan (@MumbaiManthan) May 2, 2022