अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीही सहभागी
पुणे – येथील आझम कॅम्पस ग्राऊंड, कॅम्प येथे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, तसेच अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी पुणे शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि मुसलमान यांना या इफ्तार पार्टीला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण दिले होते. विशेष म्हणजे निमंत्रण पत्रिकाही हिरव्या रंगात छापली होती. (मुसलमानांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करणाऱ्या पोलिसांनी कधीतरी हिंदूंसाठीही दिवाळी पहाट, गुढीपाडवा शोभायात्रा, दसऱ्याच्या शुभेच्छा देणे किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने मसाला दूध वाटप, असे कार्यक्रम आयोजित केलेत का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)
Hindus have to get up and start encouraging Charity, Old age homes, Orphanage homes etc.