मुंबई : मुंबईच्या प्रसिद्ध हाजी अली दर्ग्याच्या मझारपर्यंत महिलांना प्रवेश मिळावा, या मागणीसाठी स्थापन झालेल्या ‘हाजी अली सबके लिए’ फाेरममध्ये फूट पडली आहे.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंची कार्यपद्धत शांततापूर्ण नसल्याचे सांगत फोरमने स्वत:ला या आंदोलनापासून वेगळे केले आहे. दरम्यान, तृप्ती म्हणाल्या, फाेरमच्या सदस्यांत आंदोलन करण्याचा तसूभरही दम नाही. यामुळे मीच पाठिंबा मागे घेत आहे. आता भूमाता ब्रिगेड आपल्या बळावर दर्ग्यात महिलांना पुरुषांच्या समान अधिकार मिळवून देण्यासाठी लढा देईल, अशी घोषणा देसाई यांनी केली.
संदर्भ : दिव्य मराठी