Menu Close

सांतिनेझ, पणजी येथील कब्रस्तानमध्ये होणार्‍या अनधिकृत नमाजपठणाला नगरसेवकांचा विरोध

अनुमती नसतांनाही नियमितपणे नमाजपठण केले जात असल्याच्या तक्रारी

पणजी – सांतिनेझ, पणजी येथील कब्रस्तानमध्ये होणार्‍या अनधिकृत नमाजपठणाला पणजी महानगरपालिकेच्या ४ मे या दिवशी झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी विरोध दर्शवला. या प्रश्‍नी महानगरपालिकेने गांभिर्याने लक्ष घालावे, अशी मागणी नगरसेवकांनी महानगरपालिकेचे आयुक्त आग्नेल फर्नांडिस यांच्याकडे केली.

बैठकीत विरोधी नगरसेवक उदय मडकईकर म्हणाले, ‘‘सांतिनेझ, पणजी येथील मुसलमानांच्या कब्रस्तानाच्या ठिकाणी नमाजपठणाची अनुमती नाही. त्या ठिकाणी केवळ दफनविधीच्या वेळी नमाजपठण करता येते. हे निर्देश पणजी महानगरपालिकेने यापूर्वीच मुसलमान बांधवांना दिले आहेत, तरीही कब्रस्तानच्या ठिकाणी नियमितपणे नमाजपठण केले जात आहे, तसेच त्या ठिकाणी ‘मशीद’ असा फलक लावण्यात आला आहे.’’ (यातून धर्मांधांचा उद्दामपणा दिसून येतो ! आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी केलेल्या लांगूलचालनाचा हा परिणाम आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

या सूत्राकडे लक्ष देणार असल्याचे आश्‍वासन महानगरपालिकेचे आयुक्त आग्नेल फर्नांडिस यांनी दिले. महानगरपालिकेच्या बैठकीत इतर विषयांवरही चर्चा झाली. बैठकीत पणजी येथील व्यावसायिक इमारतींना लागू असलेले घरपट्टी शुल्क १२ टक्क्यांवरून १० टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय पुढील मासापासून लागू होणार आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *