Menu Close

भारताने स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित केले, तर एका वर्षात अन्य १५ देश स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करतील – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती

दिल्ली : जगद्गुरु आद्य शंकराचार्य जयंती च्या निमित्त ५ में रोजी दिल्ली येथे हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन येथील तालकटोरा स्टेडियम मध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांची वंदनीय उपस्थिति होती. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शंकराचार्य म्हणाले की “विश्वस्तरावर विकास आणि राजनीती यांना आज परिभाषित करण्याची आवश्यकता आहे. राजनीती साठी राजधर्म , क्षात्रधर्म, अर्थनीती, दंडनीती या शब्दांचा प्रयोग महाभारत, अर्थपुराण आणि मनुस्मृति मध्ये केला गेला आहे.

सुसंस्कृत, सुशिक्षित, सुरक्षित ,संपन्न, सेवापारायण , स्वस्थ सभ्यताप्रद व्यक्ति आणि समाज यांची संरचना वेदादि शास्त्र सम्मत विकास आणि राजनीती यांची परिभाषा आहे. विकास आणि राजनीती यांची परिभाषा एकच आहे.

कोरोना काळात ७० से ७५ देशांशी आमचा संपर्क झाला. विश्वातील २०४ प्रतिनिधींचे विचार आम्ही जाणून घेतले. मोरीशियस आणि अन्य देशांनी आपली व्यथा व्यक्त केली. ते म्हणाले भारताच्या दुर्बल व्यवहारामुळे आम्हाला हीनतेचा अनुभव येत आहे. भारत जर स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करेल तर एका वर्षाच्या आत अन्य १५ देश स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करतील. आम्ही लाठी , गोळी आणि बॉम्ब च्या आधारावर नाही तर प्रेम, सिद्धांत, वस्तुस्थिती आणि इतिहासाच्या आधारावर पूर्ण संपूर्ण आशिया खंडाला हिंदु महाद्वीप म्हणून उद्घोषित करू इच्छितो

मंत्रिमंडळ योग्य पद्धतीने चालवायचे असेल तर त्यामध्ये 4 ब्राह्मण , 8 क्षत्रिय, 21 वैश्य ,3 शुद्र आणि 1 सुत असण्याची आवश्यकता आहे , भारतात जे राजतंत्र होते तेच खरया अर्थाने प्रजातंत्र होते.

सर्वांचे पूर्वज वैदिक सनातनी आर्य हिंदु होते. संविधान, अधिवक्ता आणि न्यायाधीश यांना दिशादर्शन करण्याचे दायित्व शंकराचार्य यांचे असते आणि हा आमचा शाश्वत अधिकार आहे. वर्तमान मध्ये देशात लागू असलेला संविधान 75 वर्षांपासून आहे. आमचा संविधान या कल्पा मध्ये एक अरब 97 करोड 29 लाख 49 सहस्त्र 122 वर्षांचा आहे. 70 वर्ष सुरु असलेल्या संविधानाच्या आधारे आम्हाला भीती घालण्याचा प्रयत्न कुणी करू नये.

या कार्यक्रमाला 2500 लोक उपस्थित होते. यामध्ये केन्द्रीय मंत्री श्री अश्विनी चौबे , जैन समुदाय तर्फे श्री निर्मल जैन, पंजाब केसरी या वृत्तपत्राच्या निदेशक श्रीमती किरण शर्मा, सुदर्शन वाहिनी चे श्री सुरेश चव्हाणके, विश्व हिन्दू परिषदेचे अंतरराष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता अलोक कुमार जी, गंगाराम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी एस राणा आणि हिंदु जनजागृती समिती चे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. शंकाराचार्य यांनी या पूर्वी सुद्धा प्रक्षोभक वक्तव्य केले आहे आणि यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन अल्पसंख्यांक समुदाय मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असा कांगावा या याचिकेमध्ये केला गेला आहे. याचिकेवर ९ मे रोजी सुनावणी होणार आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *