प्रयागराज (उत्तरप्रदेश) – मशिदींवर भोंगे लावून अजान देणे, हा मूलभूत अधिकार नाही. या संदर्भात आम्ही यापूर्वीच आदेश दिला आहे, असे सांगत अलाहाबाद उच्च न्यायालयाने या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे.
Allahabad HC junks petition by Irfan seeking permission for Azaan on loudspeakers in the mosque, says ‘not a fundamental right’: Read full detailshttps://t.co/WNWmM3y2LR
— OpIndia.com (@OpIndia_com) May 6, 2022
१. उत्तरप्रदेशच्या बदायू येथील इरफान यांनी याचिका प्रविष्ट केली होती. याद्वारे त्यांनी त्यांच्या गावामध्ये मशिदीतील अजान भोंग्याद्वारे ऐकवण्याची अनुमती देण्याची मागणी केली होती. यावर न्यायालयाने ‘कोणताही धर्म पूजा करण्यासाठी भोंग्यांचा वापर करण्याची अनुमती देत नाही’, असे म्हटले.
२. वर्ष २०२० मध्ये खासदार अफजल अन्सारी यांच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, भोंग्यांवरून अजान देण्याला घातलेली बंदी योग्य आहे. कारण हा प्रकार इस्लामचा भाग नाही. भोंग्यांचा शोध लागण्यापूर्वी मनुष्याकडून अजान दिली जात होती. आताही मनुष्याकडून अजान दिली जाऊ शकते.