काश्मिरी छावण्यांतील निर्वासितांच्या दुःस्थितीविषयी जम्मूतील ‘द शॅडो’ या दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार किंग्ज सी भारती म्हणतात –
१. वर्ष १९९० मध्ये जिहादी आतंकवाद्यांनी सुसंस्कृत काश्मिरी हिंदु समाजाला काश्मीरमधून हाकलण्यासाठी अमानुष हत्याकांड चालू केले. त्यामुळे त्यांना त्यांच्या सर्व संपत्तीवर पाणी सोडावे लागले.
२. एकेकाळी कोट्यवधी रुपयांची संपत्ती असणार्या या कुटुंबांवर आता निर्वासितांच्या छावण्यांमध्ये दिवस ढकलण्याची वेळ आली आहे. सुमारे साडे तीन लाख काश्मिरी पंडित देहली आणि जम्मू येथील छावण्यांत आजही खितपत पडले आहेत.
३. प्रत्येकी १ शयनकक्ष आणि स्वयंपाकघर अन् ४ कुटुंबांमागे १ शौचालय आणि स्नानगृह, अशी या छावण्यांची रचना आहे.
४. या समाजातील पारंपरिक एकत्र कुटुंबपद्घती या अपुर्या जागेमुळे कधीच नामशेष झाली आहे. घरात कुणालाही एकांत मिळत नसल्याने कुटुंबांमधील तणाव आणि घटस्फोट यांचे प्रमाण वाढले आहे.
५. या छावण्यांत जन्माचे प्रमाण सतत घटत असून मृत्यूचे प्रमाण मात्र वाढत आहे.
६. स्वतःच्याच देशात त्यांना निर्वासिताचा शिक्का माथी घेऊन जगावे लागत आहे.
निर्वासित हिंदूंना काय भोगावे लागत आहे, हे यातून लक्षात येते. उद्या आपल्यावर ही वेळ येऊ द्यायची नसेल, तर याविषयी जागृती करणे आवश्यक आहे.
(संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’)
“Why is the Government not taking aggressive steps against terrorists ?