Menu Close

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील शारदा विश्‍वविद्यालयाच्या प्रश्‍नपत्रिकेत हिंदुत्वाची नाझीवादाशी तुलना !

 

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथील शारदा विश्‍वविद्यालयामध्ये हिंदुत्वाची तुलना ‘फॅसिस्ट’ (हुकूमशाही) विचारसरणीशी करण्यात आली आहे. येथे एका प्रश्‍नपत्रिकेत विद्यार्थ्यांना फॅसिस्ट आणि हिंदुत्व यांची तुलना करणारा प्रश्‍न विचारण्यात आला आहे. भाजपचे नेते विकास प्रीतम सिन्हा यांनी ट्वीट करून याची माहिती दिली आहे.

सिन्हा यांनी हा प्रश्‍न मुसलमान शिक्षकाने बनवला असल्याचा दावा केला आहे. कला शाखेच्या ‘राजनीती विज्ञाना’च्या वर्ष २०२१-२२ च्या प्रश्‍नपत्रिकेमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रश्‍नपत्रिकेत ५ वा प्रश्‍न आहे, ‘धर्मांतराचे मूळ कारण काय आहे ?’, तर ६व्या प्रश्‍नामध्ये ‘तुम्हाला नाझीवाद, फॅसिस्टवाद आणि हिंदुत्व यांत कोणती समानता दिसत आहे का ?’ असे विचारण्यात आले आहे. (हिंदुत्वाची अपकीर्ती करण्यासाठी आणि देशाच्या भावी पिढीला हिंदुविरोधी बनवण्यासाठी शिक्षणक्षेत्रातीलच काही हिंदुद्वेष्ट्यांकडून प्रयत्न केले जात आहेत, याचे हे उदाहरण होय ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) ही प्रश्‍नपत्रिका सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर अनेकांनी यावर ट्वीट करून शारदा विश्‍वविद्यालयाचा निषेध केला आहे, तर काहींनी ‘शारदा विश्‍वविद्यालयावर बंदी घाला’, अशी मागणीही केली आहे. याविषयी विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापनाने अजून काही भाष्य केलेले नाही. याविषयी काही वृत्त प्रतिनिधींनी व्यवस्थापनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, व्यवस्थापनातील व्यक्तींकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *