पुणे – भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये भारतियांनी विदेशी वस्तूंच्या वापराविषयी असलेली गुलामी वृत्ती त्यागायला हवी, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने संबोधित करतांना केले. जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या एका व्यापारी बैठकीला त्यांनी या वेळी संबोधित केले. ‘व्होकल फॉर लोकल’ या सरकारच्या स्थानिक उत्पादनांच्या प्रोत्साहनार्थ राबवण्यात येणार्या मोहिमेचा व्यापारी संघटनेने पुनरुच्चार करावा, असेही ते म्हणाले.
Vocal For Local: ‘वोकल फॉर लोकल’ का नारा देते हुए बोले पीएम मोदी- ‘हमें विदेशी सामानों का गुलाम नहीं बनना चाहिए’ https://t.co/75K23VCaBO
— News 4 Social (@newsforsocial) May 6, 2022
मोदी पुढे म्हणाले की,
१. आपण विदेशी उत्पादनांवर अवलंबून राहू नये. निर्यातीसाठी नवीन देश पादाक्रांत करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. यासंदर्भात स्थानिक बाजारांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे.
२. आपण शून्य दोष असलेली अन् निसर्गावर शून्य परिणाम करणारी उत्पादने निर्मिली पाहिजेत. आज देशामध्ये कौशल्य, व्यापार आणि तंत्रज्ञान यांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले जात आहे.
३. आज प्रतिदिन अनेक नवीन उद्योग चालू होत आहेत, तर प्रत्येक आठवड्याला एक आस्थापन ‘युनिकॉर्न’ बनत आहे. (एखाद्या आस्थापनाने व्यापार चालू केल्यावर त्याने १ बिलियन डॉलर्सची (७ सहस्र ६९० कोटी रुपयांहून अधिकची) उलाढाल घडवून आणण्यात यशस्वी झाल्यास त्या आस्थापनाला ‘युनिकॉर्न’ म्हटले जाते.)
४. ‘आत्मनिर्भर भारत’ या दिशेने आपल्याला मार्गक्रमण करायचे असून तो आपला संकल्पही आहे.