Menu Close

उज्जैन सिंहस्थासाठी पोहोचलेले शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचा मध्यप्रदेश शासनाकडून अवमान

गोव्यातही भाजपच्या शासनाकडून शंकराचार्यांचा अवमान झाला होता आणि मध्यप्रदेशातही झाला. भाजपच्या राज्यात हिंदूंना हे अपेक्षित नाही !

shankaracharya_insult
अशाप्रकारे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांना रेल्वेफलाटाच्या लोखंडी दांड्यावर बसावे लागले !

उज्जैन : सिंहस्थपर्वासाठी रेल्वेने येथे पोहोचलेले पुरीच्या गोवर्धनपीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांना अवमानाला सामोरे जावे लागले. प्रथम ते ज्या रेल्वेगाडीने येत होते ती दोन घंटे उशिरा पोहोचली. उज्जैन येथे त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना सिंहस्थक्षेत्री नेण्यासाठी मध्यप्रदेश प्रशासनाकडून कोणीही उपस्थित नव्हते. तसेच त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे शंकराचार्यांना काही वेळ फलाटावरील लोखंडी दांड्यावर बसावे लागले. या अवमानानंतरही शंकराचार्य कोणावरही अप्रसन्न झाले नाहीत. (संत स्वतःला मान मिळाला नाही, तरीही कुणावर अप्रसन्न होत नाहीत कि रागावत नाहीत: मात्र राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांना मान मिळाला नाही, तर ते अकांडतांडव करतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

मात्र त्यांच्या भक्तांकडून अप्रसन्नता व्यक्त करण्यात आली. शंकराचार्याचे अनुयायी सुधीर चतुर्वेदी, शिवशंकर शर्मा आदींनी सिंहस्थाचे प्रभारी मंत्री भूपेंद्रसिंह यांना शंकराचार्यांच्या आगमनची माहिती आधीच दिली होती. (शंकराचार्यांच्या आगमनाची माहिती देऊनही त्यांच्या स्वागतसाठी काहीही व्यवस्था न करणारे राज्यकर्ते पापीच होत ! अशांना त्यांच्या पापाने फळ मिळाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यानंतर दुपारी ३ वाजता शंकराचार्य हरसिद्धी मंदिरासमोरील त्यांच्या रूद्रसागर शिबिरासाठी मार्गस्थ झाले. ते २२ मेपर्यंत सिंहस्थ क्षेत्री रहाणार आहेत. या कालावधीत ते सकाळी ११ ते दुपारी १ आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत प्रतिदिन भक्तांना दर्शन देणार आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *