पोलिसांच्या वाहनावर चढून काच फोडली
ठाणे – येथील हरिनिवास भागात ५ मेच्या रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपक चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस ध्वनीक्षेपक बंद करण्यासाठी गेले असता आमीर शाहीद खान (वय ३३ वर्षे) याने पोलिसांशी बाचाबाची करत त्यांना धक्काबुक्की केली, तसेच पोलिसांच्या वाहनाची काच फोडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून खान याला अटक करण्यात आली आहे. या वेळी आमीर याने पोलिसांना शिवीगाळही केली, तसेच ‘ध्वनीक्षेपक वाजवा’, असे जोरजोरात ओरडूही लागला. पोलीस त्याला समजावत होते; पण त्यांना न जुमानता तो पोलिसांच्या वाहनावर चढला आणि त्याने वाहनाची समोरील काच फोडली. घटनेची तीव्रता वाढू लागल्याने पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली. (एका मुसलमानाला आवरू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांचा बंदोबस्त कसा करणार ? – संपादक दैनिक सनातन प्रभात) त्यानंतर पोलीस शिपाई ताजणे हे आमीर याला वाहनावरून खाली उतरवण्यासाठी गेल्यावर त्याने शिपायाला धक्काबुक्की केली.