कोलाकाता (बंगाल) – बंगालच्या पर्यटन विकास मंडळाचा एक आदेश सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या आदेशात म्हटले आहे की, पर्यटन विकास मंडळाने एक खासगी संस्था ‘फ्रंटलाइन एक्स सर्व्हिसमॅन ब्यूरो’ला आदेश दिला होता की, त्यांच्याकडे काम करणार्या मुसलमान कर्मचार्यांना रमझान ईदच्या पूर्वी त्यांना भेट म्हणून ४ सहस्र ८०० रुपये देण्यात यावेत. हे कर्मचारी पर्यटन विकास अधिकारी आणि पर्यटन पर्यवेक्षक म्हणून बंगाल सरकारच्या पर्यटन विकास विभागात काम करतात. फ्रंटलाइन एक्स सर्व्हिसमॅन ब्यूरो ही खासगी संस्था असून याला सरकारने खासगी संरक्षण आस्थापन म्हणून अनुज्ञप्ती दिलेली आहे.