Menu Close

मदर तेरेसा यांनी कॅथॉलिक चर्चच्या वाईट गोष्टींवर पडदा टाकण्याचे काम केले ! – माहितीपटातून आरोप

मदर तेरेसा

नवी देहली – शांततेचा नोबेल पुरस्कार आणि भारतरत्न प्राप्त मदर तेरेसा यांच्यावर एक माहितीपट (डॉक्युमेंटरी) बनवण्यात आला आहे. ‘मदर टेरेसा : फॉर दि लव ऑफ गॉड’ नावाच्या या माहितीपटामध्ये कॅथॉलिक चर्चच्या वाईट गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यात दावा करण्यात आला आहे की, मदर तेरेसा युद्ध रोखण्यास सक्षम होत्या. त्यांची अनेक देशांच्या राष्ट्रपतींशी मैत्री होती. त्यांनी जागतिक स्तरावर अनाथालयांचे एक जाळे निर्माण केले होते. त्यांच्या सांगण्यावरून अनेक रुग्ण बंदीवानांना मुक्त करण्यात आले होते; मात्र असे असतांनाही त्यांनी कॅथॉलिक चर्चमधील वाईट गोष्टींवर पडदा टाकण्याचे काम केले. या माहितीपटामध्ये मदर तेरेसा यांच्या जवळचे मित्र आणि काही विरोधक यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.

सौजन्य : Sky TV

चांगले रुग्णालय चालवण्याएवढे पैसे असतांनाही मदर तेरेसा यांनी ते केले नाही ! – ब्रिटीश डॉ. जॅक प्रेगर

मदर तेरेसा यांनी ब्रिटीश डॉ. जॅक प्रेगर यांच्या साहाय्याने समाजकार्याला प्रारंभ केला होता. या माहितीपटात त्यांनी याविषयी म्हटले होते की, तेरेसा यांच्या सुश्रुषालयातील परिचारिका रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेत नव्हत्या. एकच सिरींजचा वापर पुनःपुन्हा केला जात होता. तेरेसा यांच्याकडे गरिबांसाठी चांगले रुग्णालय चालवण्याइतपत पैसे होते; मात्र त्यांनी कधीही असे केले नाही. त्या म्हणायच्या, ‘कोणत्याही उपचाराविना आपण त्यांना होणारा त्रास दूर करण्यासाठी प्रार्थना करूया.’  परिचारिकांना सूचना देण्यात आल्या होत्या की, त्यांनी स्वतःला चाबकाने मारून घ्यावे आणि काटे असणार्‍या साखळ्या गळ्यामध्ये घालव्यात.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *