Menu Close

तमिळनाडूतील एका भागात हिंदूंनी धर्मांतर करण्यास नकार दिल्याने चर्चकडून मार्गावर भिंत उभारण्याचा प्रयत्न

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडू राज्यातील तिरुवन्नामलाईमधील मारुथुवमपडी गावामध्ये रोमन कॅथॉलिक चर्चने गावकर्‍यांना धर्मांतर करण्यास सांगितले होते; मात्र त्यांनी याला नकार दिल्याने चर्चकडून रस्ता रोखण्यासाठी भिंत बांधण्याचा प्रकार घडला आहे. या रस्त्यामुळे गावकरी मुख्य रस्त्यावर पोचू शकत होते. या प्रकरणी गावकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे ‘चर्चवर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे. तसेच या चर्चकडून चालवण्यात येणार्‍या शाळेने गावकर्‍यांच्या मुलांना शिकवण्यासही नकार दिला. या गावात अनुमाने ३ सहस्र हिंदू रहातात. चर्चकडून चालवण्यात येणार्‍या शाळेचे व्यवस्थापन पहाणारा फादर येसुपदम याच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *