पुणे – प्रतीवर्षी घेण्यात येणारा ‘ईद मिलन’ हा कार्यक्रम १२ मे या दिवशी कोंढवा खुर्द येथील एन्.आय.बी.एम् मार्गावरील, लोणकर गार्डन येथे सायंकाळी वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ‘ईद मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन केले असून स्वतः शरद पवार याचे निमंत्रक आहेत. त्यामध्ये सर्व धर्मियांचे धर्मगुरु आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित रहाणार आहेत, तसेच सर्व धर्मीय पुणेकरांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. (श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती या दिवशी हिंदूंच्या मिरवणुकांवर धर्मांधांनी आक्रमणे केली, त्यामुळे सामाजिक समरसता बिघडली, असे राष्ट्रवादी काँग्रेसला का वाटले नाही ? कि सामाजिक समरसता आणि बंधुता अबाधित राखण्याचा मक्ता हिंदूंनी घेतला आहे ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)
पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘ईद मिलन’ कार्यक्रम !
Tags : Featured News