Menu Close

मुंबईतील बहुसंख्य हिंदु विद्यार्थी असलेल्या ‘सेंट अँड्र्यूज मराठी चर्च’च्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवले जाणार बायबल !

मुंबई – भायखळा येथील ‘सेंट अँड्र्यूज मराठी चर्च’च्या वतीने चालवल्या जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी १२ ते २२ मे या कालावधीत ‘मे २०२२ समर कॅम्प’ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ‘व्हेकेशन बायबल स्कूल’ या नावाने बायबल शिकवले जाणार आहे. या शाळेत येणारे बहुतांश विद्यार्थी हिंदू आहेत. त्यामुळे हा ‘कॅम्प’ केवळ ख्रिस्ती विद्यार्थ्यांसाठी असल्याचे नमूद करणे अपेक्षित होते; मात्र हा ‘कॅम्प’ सर्वधर्मीय विद्यार्थ्यांसाठी असल्याचे शाळेच्या बाहेर लावलेल्या फलकावर नमूद करण्यात आले आहे. या ‘कॅम्प’ मध्ये २ ते १६ वर्षे वयोगटांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. यासाठी लागणारे साहित्य शाळेकडून पुरवण्यात येणार आहे. हा प्रकार म्हणजे ‘व्हेकेशन बायबल स्कूल’च्या नावाखाली हिंदु विद्यार्थ्यांच्या मनावर ख्रिस्त्यांची शिकवण कोरण्याचे षड्यंत्र असल्याची शक्यता स्थानिक हिंदूंकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *