हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा संपर्क दौरा !
पुणे – पुणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा संपर्क दौरा नुकताच पार पडला. यामध्ये अधिवक्ता, विविध संप्रदायांचे संत, हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक आणि वारकरी संप्रदाय यांच्या भेटी घेण्यात आल्या, तसेच काही ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले. या दौर्याला येथील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तसेच सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यात सहभाग दर्शवला.
संपर्क केलेले प्रतिष्ठित
ओघवते वक्तृत्व असलेल्या गीता उपासनी, त्यांचे वडील श्री. चारुचंद्र उपासनी, उद्योजक श्री. ठिगळे आणि त्यांचे मित्र श्री. कुलकर्णी, थेऊर येथील धर्मप्रेमी श्री. भरत पाठक, युवा उद्योजक श्री. राज मुच्छल आणि ‘मार्केट यार्ड व्यापारी चेंबर्स’चे अध्यक्ष श्री. राजेंद्र बाटिया.
संपर्क अभियानाला मिळालेला प्रतिसाद
१. ‘अखिल ब्राह्मण महासंघा’चे अध्यक्ष श्री. गोविंद कुलकर्णी यांनी ‘देहलीमध्ये ब्राह्मणांसाठी ‘ब्रह्मोड कार्यक्रम’ घेणार आहे’, असे सांगितले. ‘ब्रह्म केसरी’ या मासिकामध्ये राष्ट्र आणि धर्म विषयक लिखाण छापू शकतो’, असे सांगितले.
२. नंदकिशोर तिखे आणि अरविंद तिखे यांनी ‘कायदेशीर कार्यासाठी सहभाग घेऊ’, असे आश्वासन दिले.
३. श्री. सुनील भोसले हे उच्चपदावर कार्यरत असूनही त्यांना धर्मकार्याची तीव्र तळमळ आहे.
थेऊर येथे श्री विठ्ठल मंदिरात साकडे घालतांना धर्मप्रेमी
४. ‘मोरया ट्रस्ट’चे अध्यक्ष ह.भ.प. तांबे महाराज यांनी ‘हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेऊन आवश्यक ते साहाय्य करीन’, असे आश्वासन दिले. थेऊर येथील मंदिरात धर्मप्रेमींसमवेत बैठक घेऊन साकडे घातले.
५. मंचर येथे हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी यांनी ‘हलाल जिहाद’ विषयी जाणून घेऊन ‘संघटित होऊन कार्य करूया’, असा निश्चय केला.