Menu Close

मुसलमान तरुणांकडून विहिंपच्या नेत्यावर प्राणघातक आक्रमण

हनुमानगड (राजस्थान) येथे मंदिरात जाणार्‍या तरुणींची छेड काढल्याचा जाब विचारल्याचा परिणाम !

हनुमानगड (राजस्थान) – येथील रामदेव मंदिरासमोर बसलेल्या मुसलमान तरुणांनी मंदिरात जाणार्‍या तरुणींची छेडछाड केल्याविषयी जाब विचारण्यास गेलेले विश्‍व हिंदु परिषदेचे स्थानिक नेते सतवीर सहारण यांना लोखंडी सळीने मारहाण केल्याने सतवीर गंभीररित्या घायाळ झाले. त्यांना बिकानेर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही घटना ११ मेच्या रात्री घडली. या घटनेनंतर येथे विहिंपकडून निदर्शने करण्यात आल्याने येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी संवेदनशील भागात ध्वजसंचलन केले.

पोलीस अधीक्षक म्हणतात ही किरकोळ घटना !

विहिंपचे प्रांत संयोजक आशीष पारेख यांनी ‘आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा आम्ही पुढचे पाऊल उचलू’, अशी चेतावणी दिली आहे. दुसरीकडे पोलीस अधीक्षकांनी ‘ही घटना किरकोळ आहे’, असे म्हटले आहे. (एखाद्यावर प्राणघातक आक्रमण होणारी घटना किरकोळ आहे, असे म्हणणार्‍या पोलीस अधीक्षकांवर कारवाईच झाली पाहिजे; मात्र काँग्रेसच्या राज्यात असे घडणे अशक्यच आहे ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात) जिल्हाधिकार्‍यांनी ‘दोषींवर कठोर कारवाई करू’ असे आश्‍वासन दिले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *