Menu Close

पाक पाकव्याप्त काश्मीरमधील ‘हुंजा खोरे’ चीनला कर्जाच्या मोबदल्यात देणार !

नवी देहली – पाक त्याच्यावर असलेले चीनचे कर्ज फेडण्यात अपयशी ठरत असल्याने तो पाकव्याप्त काश्मिरमध्ये असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानातील एक मोठा भूभाग चीनला वापरण्यासाठी देणार असल्याची योजना आखत आहे. येथील ‘हुंजा खोरे’ हा भूभाग चीनला देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यासमवेतच चीनला गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात खनिजांचे उत्खनन करण्याची अनुमतीही दिली जाणार आहे. हुंजा खोर्‍यात ‘युरेनियम’ धातू मोठ्या प्रमाणात असल्याने अन् त्याचा उपयोग हा अणुबाँब बनवण्यात, तसेच अंतरिक्ष तंत्रज्ञानाला विकसित करण्यात होत असल्याने चिनी ड्रॅगनचा आधीपासूनच त्यावर डोळा आहे.

१. वर्ष १९६३ मध्ये पाकने पाकव्याप्त काश्मीरमधील ५ सहस्र वर्ग किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेल्या ‘शक्सगाम खोरे’ चीनला भेट म्हणून दिले होते. आजही त्यावर चीनचेच नियंत्रण आहे.

२. आता ‘हुंजा खोरे’ चीनला देण्याचे संकेत मिळाल्याने स्थानिक लोकांकडून पाक सरकारला विरोध केला जात आहे. चिनी ड्रॅगन त्याच्यावर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवेल, असेही म्हटले जात आहे.

३. पाक सरकारच्या या योजनेमुळे संतप्त झालेले पाकव्याप्त काश्मीरमधील लोक पाकिस्तानी सैन्याविरोधात संघर्ष करत आहेत.

४. स्कार्दू येथे स्थानिक लोकांनी सैन्याचे अधिकारी आणि त्यांची वाहने यांवर दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामागे सैन्याकडून तेथील काही मंत्र्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणीही लोकांमध्ये राग आहे.

५. यासमवेत ‘चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गा’च्या नावाखाली पाक सैन्य स्थानिकांची भूमी बळजोरीने घेत असल्यानेही लोक अप्रसन्न आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *