वणी (यवतमाळ) – येथील टागोर चौकातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात ९ मे या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा भावपूर्ण वातावरणात पार पडली. हिंदु धर्मावर धर्मनिरपेक्षतेच्या आडून येणारी संकटे, तसेच धर्मांधांकडून होणारी आक्रमणे यांविषयी सभेत जागृती करण्यात आली. सभेसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे साहाय्य लाभले.
सनातन संस्थेच्या सौ. मंगला दरवे म्हणाल्या, ‘‘मंदिरे ही चैतन्याचा स्रोत आहेत. मंदिर सरकारीकरणामुळे पूजा-अर्चा करण्यावर बंधने लादली जात आहेत. मंदिरे सरकारच्या तावडीतून सोडवण्यासाठी आपण हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होऊया.’’ समितीचे श्री. प्रफुल्ल टोंगे यांनी घटनेमध्येही हिंदूंवर कसा अन्याय झाला आहे, याविषयी सांगितले.