Menu Close

हिंदु धर्मस्थळांसाठी आमची सांस्कृतिक लढाई चालूच रहाणार ! – अधिवक्ता मदन मोहन यादव, वाराणसी जिल्हा न्यायालय

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद
‘ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण : न्यायालयाचा आदेश सर्वोच्च कि मुसलमान जमावतंत्र ?’

मुंबई – वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण न्यायालयाच्या आदेशानुसार चालू असतांना तेथील मुसलमानांनी विरोध करत आयुक्त आणि अधिवक्ते यांना मशिदीत प्रवेश करू दिला नाही. ही त्यांची दुष्टता आणि शिरजोरी आहे. ते वारंवार न्यायालयाची अवहेलना करत स्वत:ला न्यायालयापेक्षा मोठे समजत आहेत. वस्तूतः मुसलमानांच्या प्रत्येक मागणीला या देशात मान्य केले गेले. न्यायालयाच्या निर्णयानुसार अयोध्या येथील राममंदिर जरी आम्ही मिळवले असले, तरी काशी, मथुरा येथील हिंदु धर्मस्थळांसाठी आमची सांस्कृतिक लढाई चालूच रहाणार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन वाराणसी येथील जिल्हा न्यायालयाचे अधिवक्ता मदन मोहन यादव यांनी केले.

अधिवक्ता मदन मोहन यादव

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण : न्यायालयाचा आदेश सर्वोच्च कि मुसलमान जमावतंत्र ?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विविध सामाजिक माध्यमांद्वारे करण्यात आले. हा कार्यक्रम १ सहस्र ५८० हून अधिक जणांनी प्रत्यक्ष पाहिला.

पंडित हरिहर पांडेय

काशी येथील मंदिर आमचेच असून आम्ही ते मिळवणारच ! – पंडित हरिहर पांडेय, अध्यक्ष, काशी ज्ञानवापी अभिमुक्त न्यास

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला मुसलमान का घाबरत आहेत ? ते जमावतंत्राचा उपयोग का करत आहेत ? तिथे आमचे शिवलिंग आहे आणि देवतांच्या प्रतिमा आहेत, हे सत्य समोर येणार, याची  त्यांना भीती आहे का ? जर ते खरे आहेत, तर सर्वेक्षण होऊ द्यावे ! न्यायालयाचा निकाल अंतिम आणि सर्वमान्य असतो; मात्र त्यांनी हे मान्य केले नाही. धर्मांध जमावाचे यापुढे काही चालू देणार नाही. काशी येथील मंदिर हे आमचेच होते आणि आम्ही ते मिळवणारच.

श्री. विनोद बंसल

ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण का रोखले जात आहे ? या मशिदीमध्ये असे काय आहे, जे लपवले जात आहे ? सर्वांसमोर सत्य येणे आवश्यक आहे. या मशिदीचे सर्वेक्षण ज्यांनी रोखले, त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सरकारने कारवाई करायला हवी ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदु परिषद

हे पहा – 

 

श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी

ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण मुसलमानांनी रोखल्यावर तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी  आता देशाची राज्यघटना आणि कायदा धोक्यात येत आहे, अशी ओरड करणार नाहीत. ज्याप्रमाणे उत्तरप्रदेशमध्ये दंगलखोरांच्या अवैध अतिक्रमणावर सरकारने बुलडोझर फिरवून त्यांना धडा शिकवला, त्याच प्रकारे या जमावतंत्राला सरकारने धडा शिकवला पाहिजे. – विश्वनाथ कुलकर्णी, उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *