इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमधील पंजाब प्रांतात ऑगस्ट २०२१ मध्ये हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करून तोडफोड केल्याच्या प्रकरणी बहावलपूर येथील न्यायालयाने २२ जणांना प्रत्येकी ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली, तर ६५ जणांना मुक्त केले. यापूर्वी सर्वाेच्च न्यायालयाने सर्व आरोपींकडून १० लाख रुपये दंड वसूल केला होता, तसेच या मंदिराचा जीर्णाेद्धार करण्याचा आदेशही सरकारला दिला होता. त्या वेळी पाकचे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांनी म्हटले होते, ‘कल्पना करा की, अपवित्र करणाऱ्या अशा घटनेमुळे हिंदूंना किती मानसिक त्रास झाला असेल ?’ या तोडफोडीचा पाकच्या संसदेतही निषेध करण्यात आला होता.
रहीमयार खान जिल्ह्यातील भोंग येथील श्री गणेश मंदिरावर हे आक्रमण करण्यात आले होते. येथे एका ८ वर्षांच्या हिंदु मुलाने मदरशात लघवी केल्याच्या आरोपावरून हे आक्रमण करण्यात आले होते. मंदिराची तोडफोड करून त्याला आग लावण्यात आली होती. या वेळी पोलिसांवरही आक्रमण करण्यात आले होते.
Great!