चेन्नई (तमिळनाडू) – हिंदी भाषेपेक्षा इंग्रजी भाषा अधिक मौल्यवान आहे. त्यामुळे हिंदी ही ऐच्छिक असावी; परंतु अनिवार्य नसावी. जे हिंदी बोलतात, ते क्षुल्लक नोकर्यांमध्ये गुंतलेले आहेत. हिंदी बोलणारे लोक आमच्याकडे पाणीपुरी विकतात, असे संतापजनक विधान तमिळनाडूचे शिक्षणमंत्री पोनमुडी यांनी केलेे. कोईंबतूर येथील भारथिअर विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
तमिलनाडु में हिंदी का फिर अपमान:एजुकेशन मिनिस्टर पोनमुडी बोले- हमारे कोयंबटूर में हिंदी बोलने वाले पानीपुरी बेचते हैं। pic.twitter.com/THmPFowlTM
— PRAKASH MISHRA (@imrealprakash1) May 14, 2022
पोनमुडी पुढे म्हणाले की, इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा अगोदरपासून शिकवली जात असतांना हिंदी का शिकावी ? तमिळनाडू भारतातील शिक्षणव्यवस्थेत आघाडीवर आहे. तमिळ विद्यार्थी कोणतीही भाषा शिकण्यास सिद्ध आहेत.