Menu Close

उत्तरप्रदेशात आमीरकडून शिक्षिकेवर बलात्कार !

इस्लाम स्वीकारून लग्न करण्यासाठी दबाव !

 

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील शाहजहांपूर येथे आमीर नावाच्या एका वासनांधाने शाळेतून परतणाऱ्या शिक्षिकेला इच्छित स्थळी सोडण्याच्या बहाण्याने तिला स्वतःच्या वाहनात बसवले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. या वेळी घटनेचा व्हिडिओही बनवण्यात आला. त्यानंतर तो शिक्षिकेवर इस्लाम स्वीकारून लग्नाचा दबाव आणत होता. या प्रकरणी पोलिसांत आमीर, त्याची आई, बहीण आणि भाऊ यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

पीडित महिला एका गावातील प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. तिच्याच गावात रहाणारा आमीर तिला ओळखतो. ४ मे या दिवशी शिक्षिका शाळेतून घरी जात असतांना आरोपी आमीरने ‘तुम्हाला घरी सोडतो’, असे शिक्षिकेला सांगितले. त्यानंतर त्याने शिक्षिकेला मादक पदार्थ देत बिजलीपुरा मोहल्ल्यात त्याच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. काही वेळाने ती शुद्धीवर आल्यानंतर त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली.

Related News

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *