Menu Close

इमामाचा स्वतःच्या ३२ वर्षांहून लहान पत्नीला तलाक !

भोपाळ (मध्यप्रदेश) – पचमढी येथील जामा मशिदीच्या हाफिज हफीजुर्रहमान नावाच्या इमामाने त्याच्याहून ३२ वर्षे लहान असलेल्या पत्नीला पत्र लिहून तलाक दिल्याची घटना घडली आहे. इमामाने त्याच्याच २१ वर्षीय विद्यार्थिनीशी दीड वर्षापूर्वी विवाह केला होता. पीडितेने या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.

पीडितेशी गुपचुप विवाह केल्याने मशिदीच्या व्यवस्थापनाने इमामाला पदावरून काढून टाकले होते; परंतु त्याने क्षमा मागितल्यावर त्याला पुन्हा इमामपद देण्यात आले. कालांतराने पत्नीला कागदावर लिहून तलाक दिल्याने त्याला पुन्हा पदावरून काढण्यात आले. या प्रकरणी पचमढी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पीडितेने व्यक्त केलेली तिची करुण कहाणी !

पीडितेने सांगितले की, हाफिज हफीजुर्रहमान याने माझे जीवन उद्ध्वस्त केले आहे. ते माझ्याकडे वाईट दृष्टीने पहात असत. त्यांची मुले माझ्या बरोबरीची आहेत. त्यांनी मला मदरशाची मुख्याध्यापक बनवण्याची लालूच दाखवून माझ्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यास नकार दिल्यावर माझी अपकीर्ती करण्याची धमकी देऊन नोव्हेंबर २०२० मध्ये माझ्याशी विवाह केला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *