Menu Close

धार्मिक स्थळांमधील प्रसाद आणि पाणी यांत विषप्रयोग करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणातील अल्पवयीन धर्मांध आरोपी दोषी !

संभाजीनगर – ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेच्या सूचनेनुसार धार्मिक स्थळांच्या प्रसाद आणि पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विष कालवून मोठी जीवितहानी करण्याचा कट ३ वर्षांपूर्वी काही संशयित तरुणांनी रचला होता; पण आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.ने) जानेवारी २०१९ मध्ये हा डाव उधळून लावत संभाजीनगर येथून ५, तर मुंब्रा (जिल्हा ठाणे) येथून ४ जणांना अटक केली होती. तेव्हा एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला कह्यात घेतले होते. ‘ए.टी.एस्.’ने २ वर्षे केलेल्या अन्वेषणात या विधीसंघर्षग्रस्त (लहान वयातही गुन्हे करणारी बालके) बालकांवरही सर्व आरोप सिद्ध झाले आहेत.

अल्पवयीन मुलाला ३ वर्षे ‘स्पेशल होम’मध्ये ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश !

तत्कालीन पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, गौतम पातारे, विजयंत जैस्वाल यांच्या पथकाने सखोल अन्वेषण करून अल्पवयीन मुसलमान मुलाला कह्यात घेतले. इंग्रजी माध्यमातून इयत्ता १० वीत शिकणारा हा धर्मांध मुलगा टेलिग्रामवरील ‘उम्मत-ए-महंमदिया’ या गटावरून संशयितांच्या संपर्कात आला. ते या गटाद्वारे इसिसच्या संपर्कात रहायचे. इसिसचा प्रमुख हस्तक त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत होता. हा मुलगाही या गटाचा सदस्य होता. त्याच्याकडून भ्रमणभाष आणि भ्रमणसंगणक पथकाने जप्त केले. त्यात इसिसचे साहित्य आणि संवाद हे सबळ पुरावे मिळाले. पथकाने ते न्यायालयासमोर सादर केले. तेव्हापासून तो सुधारगृहात होता. बालन्याय मंडळ, संभाजीनगर येथे पथकाने अंतिम चौकशी अहवाल सादर केला. २ वर्षांपासून खटल्याची सुनावणी चालू होती. बालन्याय मंडळाने अहवालावरून ११ मे या दिवशी अंतिम निकाल देत त्या अल्पवयीन मुलाला विविध कलमांन्वये दोषी ठरवले. बालन्याय अधिनियम कलम १८ (जी) च्या तरतुदींनुसार त्याला ३ वर्षे ‘स्पेशल होम’मध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मुंबई, ठाणे आणि संभाजीनगर येथे आतंकवादी आक्रमण घडवून आणण्याचा कट इसिसने रचला !

मुंबई, ठाणे आणि संभाजीनगर येथे आतंकवादी  आक्रमण घडवून आणण्याचा कट ‘इसिस’ने रचला होता. या घटनेनंतर आतंकवादी करवाया करणारे तरुण सिरिया येथे पळून जाणार होते. यात काही स्थानिक तरुणांचाही सहभाग असल्याची कुणकुण येथील पथकाला ऑगस्ट २०१९ पासून लागली होती. सखोल अन्वेषण केल्यानंतर ‘ए.टी.एस्.’ने जानेवारीमध्ये मोहसीन सिराजउद्दीन खान, मजहर अब्दुल रशीद शेख, महंमद तकी सिराजुद्दीन खान, महंमद मुशाहिद उल इस्लाम अब्दुल माजिद, महंमद सर्फराज अब्दुल हक उस्मानी, जमान नवाब खुटेउपाड, सलमान सिराजउद्दीन खान, फहाद महंमद इस्तेयाक अन्सारी आणि तल्हा हनीफ पोतरीक यांना अटक केली होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *