मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमी मंदिराच्या प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेली याचिका येथील जिल्हा न्यायालयाने स्वीकारली आहे. या याचिकेद्वारे श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंची असल्याचा दावा करण्यात आला आहे, तसेच या ठिकाणी सध्या असणारी शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
.#KrishnaJanmabhoomi case | According to the petition, the Shahi Idgah mosque is built on the land that belongs to the Keshav Dev temple, the birthplace of Lord Krishna https://t.co/BonEjFB1Bu
— The Hindu (@the_hindu) May 19, 2022
‘श्रीकृष्ण विराजमान’च्या वतीने ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. गेले दीड वर्षे या याचिकेवर सुनावणी चालू होती, अंततः ही याचिका स्वीकारण्यात आली. आता यावर पुढील सुनावणी केली जाणार आहे. श्रीकृष्णजन्मभूमीच्या १३.३७ एकर भूमीवर हिंदु पक्षाकडून दावा करण्यात आला आहे.