वाराणसी (उत्तरप्रदेश) – न्यायालयाच्या आदेशाने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे की, ज्ञानवापी येथे मंदिर पाडून मशीद बनवण्यात आली. तेथील शिवलिंगाची सत्यता ३५२ वर्षांनी जनतेच्या समोर आली आहे. जे लोक त्याला कारंजा म्हणत आहेत, ते कारंजे नाही, तर केवळ शिवलिंग आहे आणि त्याची उंची अन् खोली अधिक असू शकते. ३५२ वर्षांपूर्वी कुठे कारंजे होते ? त्याला कुठेही छेद नाही, पाणी येण्याची जागा नाही, पाईपलाईन नाही. मंदिराच्या शिखरावर तथाकथित घुमट आहे. त्याच्याखाली मंदिराचे खरे घुमट आहे. याची छायाचित्रेही समोर आली आहेत, अशी भूमिका हिंदु पक्षाचे अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना मांडली.
गुंबद के नीचे मंदिर का शिखर मिला, POP से छिपाया गया… ज्ञानवापी केस में हिंदू पक्ष के वकील का दावा #GyanvapiSurveyhttps://t.co/nzEXNfriJq via @NavbharatTimes
— NBT Hindi News (@NavbharatTimes) May 19, 2022
ज्ञानवापीमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस लावून अनेक गोष्टी लपवण्याचा प्रयत्न !
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन म्हणाले की, आज सर्वेक्षणाचा जो अहवाल सादर करण्यात आला आहे, त्यात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ज्ञानवापीमध्ये अनेक गोष्टींवर प्लास्टर ऑफ पॅरिस लावून लपवण्यात आले आहे. तरीही काही गोष्टी अगदी स्पष्ट दिसत आहेत. तेथे खंडित मूर्ती सापडल्या आहेत. ‘पीओपी’ला हात लावला असता ते नुकतेच लावण्यात आल्यासारखे वाटत आहे. मुसलमान पक्ष भ्रमित करत आहे.