शासनाकडून गोवंश हत्याबंदी कायद्याची ठोरात कठोर कार्यवाही करणे आवश्यक !
पिंपरे खुर्द (जिल्हा पुणे) : पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द येथील गावकर्यांच्या सतर्कतेमुळे ८ गोवंशियांचे प्राण वाचले आहेत. नीरा पोलिसांनी या प्रकरणातील पसार झालेल्या धर्मांधाला अटक केली आहे. (गोरक्षणासाठी पुढाकार घेणार्या पिंपरे खुर्द ग्रामस्थांचे अभिनंदन ! असे सतर्क ग्रामस्थ सर्वत्र हवेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. पिंपरे खुर्द या गावातील एका शेतात धर्मांधांकडून गोवंशियांची हत्या मोठ्या प्रमाणात होत होती. या प्रकरणातील कह्यात असलेेले शेतभूमीचे मालक नामदेव कुंडलिक थोपटे यांच्या गोठ्यात अद्यापही गोवंश असल्याची माहिती तेथील नागरिकांनी गोरक्षक आणि पोलीस यांना दिली.
२. त्यानुसार पोलिसांनी हिंदुस्थान गोरक्षक संघाचे श्री. पंडित मोडक आणि अन्य गोरक्षक यांच्या साहाय्याने ६ गायी आणि २ वासरे यांची सुटका केली. सदर गोवंशियांना वडकी (जिल्हा पुणे) येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेत सोडण्यात आले आहे.
३. या प्रकरणी पसार झालेला कसाई अन्वर अख्तर कुरेशी याला पोलिसांनी बारामती येथून कह्यात घेतले. थोपटे आणि कुरेशी या दोघांना सासवड न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
४. या प्रकरणानंतर पिंपरे खुर्द पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नामदेव थोपटे यांच्याशी कोणताही संबंध ठेवू नये आणि सोयरिक करू नये, अशी भावना गावकरी आणि नातेवाईक यांनी व्यक्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात