(‘शत्रू संपत्ती’ म्हणजे फाळणीच्या वेळी भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मुसलमानांची संपत्ती)
खरेदीदार मुसलमानाने मंदिर तोडून हॉटेल बांधले !
कानपूर (उत्तरप्रदेश) – येथे आबिद रहमान या पाकिस्तानी नागरिकाने ‘शत्रू संपत्ती’वर असलेले राम जानकी मंदिर आणि त्याची इतर मालमत्ता अवैधरित्या विकली. ज्याला हे मंदिर विकले त्या मुख्तार बाबा या खरेदीदाराने मंदिर तोडून त्याजागी हॉटेल बांधले. याची माहिती मिळाल्यानंतर आता या प्रकरणात ‘शत्रू संपत्ती’ कार्यालयाच्या अधिकार्याने मंदिर आणि इतर २ मालमत्ता ‘शत्रू संपत्ती’ म्हणून सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. त्याचसमवेत मंदिर विकत घेऊन त्याजागी हॉटेल बांधणार्यावर कारवाई करत त्याला नोटीसही बजावण्यात आली आहे. मुख्तार बाबाचा मुलगा महमूद उमर याने म्हटले, ‘या प्रकरणी आमच्याकडे भूमीशी संबंधित सर्व ठोस कागदपत्रे असून लवकरच सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ.’
विराजमान थे राम-जानकी, मंदिर की एक-एक ईंट निकाल खोल ली बिरयानी रेस्टोरेंट
पाकिस्तानी आबिद रहमान की कानपुर में पंक्चर बनाने वाले मुख्तार से ये कैसी डील#Kanpur #Temple https://t.co/uDZtuj6B7q
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 20, 2022
वर्ष १९८२ मध्ये आबिद रहमान नावाच्या पाकिस्तानी नागरिकाने उत्तरप्रदेशातील बेकनगंजमधील भूमीचा काही भाग मुख्तार बाबा नावाच्या व्यक्तीला विकला होता. या विक्रीसाठी आबिद भारतात आला होता. कागदपत्रांमध्ये भूमीचा हा भाग मंदिर परिसर म्हणून नोंद आहे. मुख्तार बाबा एकेकाळी या मंदिर परिसरात सायकल दुरुस्तीचे दुकान चालवत होता.