Menu Close

राजगड (मध्यप्रदेश) येथे दलित हिंदु तरुणाच्या वरातीवर मशिदीमधून दगडफेक

प्रशासनाने आरोपींची अवैध घरे पाडली !

आरोपींच्या अनधिकृत घरांवर कारवाई करून ती पाडून टाकण्यात आली

राजगड (मध्यप्रदेश) – येथे एका दलित हिंदु तरुणाच्या वरातीवर मशिदीमधील मुसलमानांकडून दगडफेक करण्यात आल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली. तसेच या आरोपींच्या अनधिकृत घरांवर कारवाई करून ती पाडून टाकण्यात आली.

१८ मेच्या रात्री दलित असणार्‍या या तरुणाच्या विवाहाची मिरवणूक मशिदीजवळून जात असतांना मुसलमानांनी वरातीमध्ये वाजवल्या जाणार्‍या वाद्याला विरोध केला. त्यांनी या वाद्यांचा आवाज अल्प करण्यास सांगितला. त्यावरून वाद झाला. त्यानंतर मशिदीमधील लोकांनी दगडफेक करण्यास चालू केले. तसेच वरातीतील काही महिलांचा विनयभंग केला. या दगडफेकीत ५ लहान मुले घायाळ झाली. या प्रकरणी एकूण २१ जणांनी ओळख पटली आहे. त्यांतील ८ जणांना अटक करण्यात आली. आरोपींनी जिरापूरच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये सरकारी भूमीवर अवैध घरे बांधली होती. अशा ४८ घरांना पाडण्यात आले. (जर ही घटना घडलीच नसती, तर प्रशासनाने ही अवैध घरे पाडली नसती, असे समजायचे का ? अशी घरे सरकारी भूमीवर बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशाच प्रकारे राज्यात अन्यत्र सरकारी भूमीवर अवैध बांधकामे झाली असतील, तर त्यांच्यावर अतिक्रमण करणार्‍यांनी कुठेतरी दगडफेक केल्यानंतरच कारवाई होणार आहे का ? – संपादक  दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *