हिंदूंना धर्मशिक्षित करण्यासाठी जे भारतीय राज्यकर्त्यांनी करायला हवे, ते विदेशातील संस्था करतात, यापेक्षा लज्जास्पद काय असेल ?
लंडन : ब्रिटिश म्युझियम (संग्राहलय) आणि गुगल कल्चरल इन्स्टिट्यूट (गूगल सांस्कृतिक संस्था) यांनी सेलिब्रेटिंग गणेशा (श्री गणेश जाणून घ्या) नावाचे ऑनलाइन प्रदर्शन भरवले आहे. श्री गणेशाची चित्रे आणि वैशिष्ट्ये समजून घेऊन त्याच्या सर्वाधिक प्रसिद्ध गोष्टी जाणून घ्या ! हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. (ब्रिटिश म्युझियम आणि गुगल कल्चरल इन्स्टिट्यूट यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या प्रदर्शनात १२ व्या शतकातील श्री गणेशाची मूर्ती, १६ व्या शतकातील श्री गणेशाचे तैलचित्र, तंजावुर (तमिळनाडू) येथील १७ व्या शतकातील एका तैलचित्रात एका मिरवणुकीमध्ये असलेला श्री गणेश, १८ व्या शतकातील महाराष्ट्रातील श्री गणेशाचे तैलचित्र इत्यादींचा समावेश आहे. तसेच या प्रदर्शनात महाराष्ट्रात श्री गणेशमूर्ती बनवण्याची प्रक्रिया आणि तिची उपासना या विषयावर असलेल्या व्हिडिओचाही समावेश करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ उंदीर हे गणपतीचे वाहन का आहे ?, गणपतीला हत्तीचे मुख का ?, गणपतीचा एक दात तुटलेला का आहे ? इत्यादी विषयांवरही प्रकाश टाकतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात