हिंदु पक्षाने सर्वोच्च न्यायालयात दिली माहिती !
नवी देहली – ज्ञानवापी मशीद नसून ते मंदिर आहे. ही संपत्ती नेहमीच काशी विश्वेश्वराची राहिली आहे. भारतातील इस्लामी सत्ताकाळाच्या सहस्रो वर्षांपूर्वीपासून ती संपत्ती काशी विश्वेश्वराची राहिलेली आहे. तेच याचे खरे मालक आहेत. हिंदू शतकानुशतके येथे धार्मिक परंपरा पार पाडत आले आहेत. औरंगजेबाने काशी विश्वेश्वर मंदिराचा काही भाग पाडून तेथे ज्ञानवापी मशीद उभी केली; मात्र ते तेथील धार्मिक स्वरूप पालटू शकले नाहीत; कारण तेथे शृंगारगौरी, भगवान श्री गणेश आणि अन्य हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आजही आहेत. त्यामुळे ही जागा मशीद नाही, अशी माहिती हिंदु पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली.
‘ज्ञानवापी मस्जिद नहीं, मंदिर है’ हिंदू पक्ष का सुप्रीम कोर्ट में लिखित जवाब https://t.co/f7ZFLBnrQi#supremecourt #hindu #gyanvapimasjid #gyanvapitemple #NationalNews #punjabkesari #punjabkesarinews pic.twitter.com/7wUzYogpEo
— Punjab Kesari (@punjabkesari) May 20, 2022
हिंदु पक्षाने पुढे म्हटले आहे की, काशी विश्वेश्वराची संपत्ती अन्य कुणाला दिली जाऊ शकत नाही. औरंगजेबाने त्यावर अवैध नियंत्रण मिळवले. यामुळे या संपत्तीचा अधिकार मुसलमानांना मिळत नाही.