कुतूबमिनार येथे पूजा करू देण्याच्या मागणीवर आज सुनावणी
वाराणसी (उत्तरप्रदेश) – कुतूबमिनारच्या परिसरात २७ हिंदु आणि जैन मंदिरांचे अवशेष पसरलेले आहेत. आमच्याकडे इतके पुरावे आहेत की, ते कुणी नाकारूच शकत नाही, असे प्रतिपादन या प्रकरणातील याचिकाकर्ते पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी ‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी बोलतांना केले. २४ मे या दिवशी येथे हिंदूंना पूजा करण्याची अनुमती देण्याची मागणी करणार्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांना प्रश्न विचारण्यात आले होते.
सुनवाई से पहले याचिकाकर्ता हरिशंकर जैन ने कुतुब मीनार को लेकर बड़ा दावा किया है
(@varunjournalist ) https://t.co/EXsbZPLQ2Y— AajTak (@aajtak) May 23, 2022
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी मांडलेली सूत्रे
१. कुतूबमिनारच्या दक्षिणेकडे असलेल्या लोकस्तंभाच्या समोर ज्या काही कलाकृती दिसत आहेत, ते सर्व मंदिरांचे अवशेष आहेत. अशा कलाकृती हिंदूंच्या मंदिरांमध्ये सहज दिसून येतात. येथील परिसर मंदिरांच्या अवशेषातूनच बनवण्यात आला आहे.
२. आमच्याकडे जितके पुरावे आहे, ते सर्व पुरातत्व विभागाच्या पुस्तकांतीलच आहेत. पुरातत्व विभागाचेच म्हणणे आहे की, हे अवशेष मंदिरांचे आहेत. येथील मंदिरांमध्ये हिंदु आणि जैन या दोन्ही धर्मांचे लोक पूजा करत होते.
३. हिंदु आणि जैन यांना वेगळे समजू नका; कारण जैन मंदिरांमध्ये हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती होत्या आणि लोक त्यांची पूजाही करत होते. जेथे जैन मंदिरे होती, त्यांच्या जवळ हिंदूंचीही मंदिरे बांधली जात होती. कुतूबमिनार हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे.
४. मी या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाकडे एकच मागणी करीन की, येथे पूजा करण्याची अनुमती द्यावी. तेथे पूर्वी जे काही झाले आहे, ते आता पालटता येणार नाही; मात्र पूजा करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे.
0 Comments