|
पुणे – काशीतील ज्ञानव्यापी मशिदीप्रमाणे पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या २ मंदिरांच्या जागेवर छोटा शेख अन् बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत. या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी या पुढच्या काळात लढा उभारला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री. अजय शिंदे यांनी केली. याविषयी श्री. शिंदे यांनी महानगरपालिका आणि पुरातत्व विभाग यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
“पुण्यातील बडा शेख, छोटा शेख दर्गा म्हणजे पुण्येश्वर-नारायणेश्वराची मंदिरं”, मनसेच्या दाव्याने नवा वादhttps://t.co/NtBTpRmnlk#Pune #MNS #AjayShinde @mnsadhikrut
— LoksattaLive (@LoksattaLive) May 23, 2022
श्री. अजय शिंदे पुढे म्हणाले,
‘‘पुण्येश्वराला पण तेवढाच मोठा इतिहास आहे. अल्लाउद्दीन खिलजीचा एक सरदार बडा अरब पुण्यावर चाल करून आला. त्या वेळी त्याने भगवान शंकराचे मंदिर उद्ध्वस्त केले. आधी अल्लाउद्दीन खिलजी आणि नंतरच्या काळात औरंगजेब याने पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही २ मंदिरे उद्ध्वस्त केली. त्या ठिकाणी दर्गे बांधण्यात आले. कसबा पेठेत कुंभारवाड्यात असलेल्या पुण्येश्वर मंदिराच्या जागेवर सध्या ‘छोटा शेख’ नावाने दर्गा बांधण्यात आला आहे. या दर्ग्याच्या परिसरात औरंगजेबाच्या नातवाची कबरही आहे. दुसरा दर्गा शनिवारवाड्यासमोर नारायणेश्वर मंदिर पाडून बांधण्यात आला आहे. कुंभारवाड्यातील मंदिराच्या जागेवर बांधण्यात आलेल्या दर्ग्याला ‘छोटा शेख दर्गा’, तर नारायणेश्वराच्या जागेवर बांधण्यात आलेल्या दर्ग्याला ‘बडा शेख दर्गा’ असे नाव देण्यात आले आहे. दोन्ही मंदिरांच्या मुक्तीसाठी पुष्कळ आधीपासून मी काम करत आहे.’’