वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात
भठिंडा (पंजाब) – अज्ञातांनी येथे हनुमान चालिसाच्या पुस्तिका जाळल्याची घटना नुकतीच घडली. ही घटना समजताच हिंदूंकडून संताप व्यक्त केला गेला. ‘दैनिक भास्कर’ने हे वृत्त दिले आहे.
Hanuman Chalisa Sacrilege: Burnt copy of Hanuman Chalisa found in Bathinda in Punjab, probe initiatedhttps://t.co/eOiHYtDlCW
— OpIndia.com (@OpIndia_com) May 18, 2022
याविषयी माहिती देतांना हिंदु संघटनांचे नेते सुखपाल सरन आणि संदीप अग्रवाल म्हणाले की, काही जणांनी हनुमान चालिसाच्या पुस्तिका जाळून त्या किला साहिबजवळ टाकल्याची माहिती आम्हाला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोचला. त्यांनी हनुमान चालिसाच्या पुस्तिकांची जळलेली पाने जप्त करून चौकशी चालू केली आहे.’ ’शहरातील वातावरण बिघडवण्यासाठी काही लोकांनी हे कृत्य केले आहे. या प्रकणातील आरोपींना लवकरच अटक केली जाईल’, असे आश्वासन भठिंडाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जे. एलेनचेजियन यांनी दिली.