जमीयत-उलमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना (इस्लामचे धार्मिक नेते) महमूद मदनी यांचे ‘दुःख’ !
देवबंद (उत्तरप्रदेश) – आज आम्हाला आमच्याच घरात अनोळखी ठरवले गेले आहे. जे लोक अशा प्रकारचा कृती आराखडा बनवत आहे, त्यानुसार आम्ही चालणार नाही. ‘अखंड भारत’ बनवण्याची भाषा केली जात असतांना मुसलमान या देशात रस्त्यावरून नीट चालूही शकत नाही, असे वातावरण निर्माण केले जात आहे. हा कोणता ‘अखंड भारत’ बनवण्यात येणार आहे ? आम्ही आग आगीने विझवू शकत नाही. द्वेषाला प्रेमाने हरवावे लागेल, असे विधान जमीयत-उलमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना (इस्लामचे धार्मिक नेते) महमूद मदनी यांनी येथे केले.
#UttarPradesh #मौलाना महमूद मदनी ने @BJP4India @RSSorg पर बोला हमला नफरत का बाजार सजाने वाले देश के असल दुश्मन,
अखंड भारत की बात करने वाले वर्ग विषेश को निशाना बना रहेराष्ट्र मजबूत करने की बात करते हैं लेकिन नफरत के टोले पर खामोश रहते हैं@JPNadda https://t.co/ygh3PNHmfA— ABI News Agency (@ABINewsAgency) May 28, 2022
(प्रेमाने हरवण्यासाठी अन्य धर्मियांविषयी प्रेम असावे लागते. प्रेम प्रत्यक्ष करून दाखवावे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) ते येथे जमीयत-उलमा-ए-हिंदने आयोजित केलेल्या २ दिवसीय कार्यक्रमात बोलत होते. या वेळी ते भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. (काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशसंहार करण्यात आला, देशात ठिकठिकाणी हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदीजवळ आक्रमण केले जात असतांना मदनी यांच्या डोळ्यांत अश्रू येत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)
मौलाना मदनी पुढे म्हणाले की, जर आम्ही देशात द्वेष पसरवणार्यांना तशाच प्रकारे उत्तर दिले, तर ते त्यांचा हेतू साध्य करण्यात ते यशस्वी ठरतील. देशात अशा प्रकारचे द्वेषाचे दुकान चालवणारे देशद्रोही आहेत. मुसलमानांनी निराश होण्याची आवश्यकता नाही. आपण संकटात आहोत; कारण आपल्या सहनशीलतेची परीक्षा घेतली जात आहे. काहीही झाले, तरी आपण आपल्या प्रामाणिकतेशी तडजोड करायची नाही.