Menu Close

(म्हणे) ‘भारताने जम्मू-काश्मीरला कलम ३७० पुन्हा बहाल करावे !’ – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान ) – आशियातील चिरस्थायी शांततेसाठी भारताने ५ ऑगस्ट २०१९ पूर्वी असलेली जम्मू-काश्मीरची स्थिती कायम ठेवावी आणि जम्मू-काश्मीर राज्याला कलम ३७० पुन्हा बहाल करावे. जेणेकरून जम्मू-काश्मीरचा प्रश्‍न चर्चेने सोडवला जाईल, असे आवाहन पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्याच भाषणात केले.

पंतप्रधान शरीफ म्हणाले की, आमच्या भावी पिढ्यांना त्रास का घ्यायचा ? संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार आणि काश्मिरींच्या अपेक्षांनुसार हा प्रश्‍न सोडवू या, जेणेकरून सीमेच्या दोन्ही बाजूंची गरिबी संपुष्टात येईल.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *