सातारा – लडाख येथे सैनिकांना घेऊन जाणारी बस नदीमध्ये कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये खटाव तालुक्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांना वीरमरण प्राप्त झाले. यामुळे शिंदे कुटुंबियांसह संपूर्ण खटाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
विजय शिंदे हे वर्ष १९९८ मध्ये २२ मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये लष्करी सेवेत रुजू झाले. २४ वर्षांच्या काळात त्यांनी विविध ठिकाणी काम करून देशाचे रक्षण केले. विजय यांचे वडील सर्जेराव शिंदे हेही लष्करामध्ये होते, तसेच विजय यांचे मोठे बंधू प्रमोद शिंदे हे लष्करात पॅरा कमांडो म्हणून कार्यरत आहेत. विजय शिंदे यांचे पार्थिव २९ मे या दिवशी विसापूर येथे आणले जाणार आहे. तिथेच शासकीय पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.