अलीगड : फेसबूकच्या माध्यमातून लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या बंगाल येथील एका युवतीचे अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी शुद्धीकरण करून तिला स्वधर्मात परत घेतले.
१. युवतीची फेसबूकच्या माध्यमातून अलीगड येथील शादाब याच्याशी मैत्री झाली. त्याने जवळीक साधून तिला अलीगड येथे बोलावले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
२. शादाबच्या दबावाखाली तिने इस्लाम धर्म स्वीकारून त्याच्याशी विवाह केला. विवाहानंतर तिचे नाव जरीन असे ठेवण्यात आले. (वारंवार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढणार्या पुरोगामी महिला याविरोधात आवाज उठवणार आहेत का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. विवाहानंतर युवतीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. अत्याचारांना कंटाळून युवतीने स्वत:ची सुटका करून घेतली आणि ती हिंदू महासभेच्या संपर्कात आली. (हिंदू मुलींनो, लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकल्यावर होणारी फसवणूक जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. ५ मे या दिवशी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी आर्य समाज मंदिरात युवतीचे शुद्धीकरण केले आणि तिला हिंदु धर्मात घेतले. पोलिसांनी युवती आणि हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांची चौकशी केली. (चोर सोडून संन्याशाला फासावर लटकवण्याचा प्रयत्न करणारे कायदाद्रोही पोलीस ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
लव्ह जिहादच्या विरोधात चालवले जाणारे अभियान
आर्य समाज मंदिरात यज्ञाद्वारे शुद्धीकरण करून धर्मांतरितांना स्वधर्मात घेण्याचे कार्य हिंदू महासभा करते. हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा पांडेय यांनी म्हटले आहे की, लव्ह जिहादसारख्या घटनांना रोखण्यासाठी त्याच्या विरोधात कृतीशील होण्याची आवश्यकता आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात