Menu Close

हलालचे मांस सेवन केल्याने हिंदूंची धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती अल्प होईल !- पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, शदाणी दरबार, रायपूर

रायपूर (छत्तीसगड) येथे ‘हलाल प्रमाणपत्र एक षड्यंत्र’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन

परिसंवादामध्ये बोलतांना उजवीकडे श्री. सुनील घनवट, व्यासपिठावर पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज (डावीकडून तिसरे), सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर (डावीकडून चौथे) आणि संत अन् मान्यवर

रायपूर (छत्तीसगड) – हलाल मांस सेवन केल्याने हिंदूंची धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती अल्प होत जाणे, ही फार गंभीर समस्या आहे. हिंदु जनजागृती समितीच्या जनजागृती अभियानातून या विषयाची गंभीरता लक्षात आली. याविषयीची सर्व माहिती तळागाळातील हिंदूंपर्यंत पोचवण्याची नितांत आवश्यकता आहे.

‘शदाणी दरबार’चे पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज

समितीच्या या कार्यात नेहमीच पू. शदाणी दरबारचे संपूर्ण सहकार्य राहील, असे प्रतिपादन येथील ‘शदाणी दरबार’चे पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समिती, अखिल भारतीय हिंदु स्वाभिमान सेना आणि शदाणी सेवा मंडळ, रायपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हलाल प्रमाणपत्र एक षड्यंत्र’ या विषयावर येथील पू. शदाणी दरबार तीर्थ येथे नुकतेच परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.

पू. अशोक पात्रीकर

हिंदूंनी संख्याबळापेक्षा आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदूंमधील धर्माभिमान लोप पावल्यामुळे हिंदूंसमोर धर्मांतर, लव्ह जिहाद, हलाल प्रमाणपत्र अशी अनेक संकटे विक्राळ रूप धारण करून उभी आहेत. आज हिंदु तरुणीच नाही, तर हिंदु तरुणही ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. या समस्यांना सामोरे जाण्यासाठी केवळ शारीरिक, बौद्धिक, मानसिक बळ, तसेच संख्याबळ पुरेसे नाही, तर साधना करून आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक आहे. या बळावरच येत्या काळात आदर्श हिंदु राष्ट्राची स्थापना होईल.


हे ही पहा –

हलाल प्रमाणपत्र एक षड्यंत्र ! (चित्रावर क्लिक करा)

हलाल प्रमाणपत्रामुळे भविष्यात हिंदूंना चरितार्थ चालवणे अशक्य होईल ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्राने हिंदूंसमोर एक राष्ट्रव्यापी गंभीर संकटाचे रूप धारण केले आहे. या माध्यमातून ८० टक्के हिंदूंच्या भावनांशी खेळ केला जात आहे, तसेच या माध्यमातून हिंदूंचे आर्थिक शोषणही होत आहे. याविरोधात सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पुढील काळात हिंदूंना चरितार्थ चालवणे अशक्य होईल.

संतांच्या शुभहस्ते सन्मानित होणे कुठल्याही पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ ! – योगेश मिश्रा, ब्युरो चीफ, ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनी

संतांच्या शुभहस्ते सन्मानित होणे, हे कुठल्याही पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ आहे. यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. आपण कुठेही असलो, तरी आपला महान हिंदु धर्म आणि संस्कृती यांविषयी जागृती करायला हवी. आपल्याला कुणी कट्टर हिंदु म्हटले तरी चालेल; पण आपण तत्त्वनिष्ठ आणि धर्मनिष्ठ राहूनच कार्य करत राहिले पाहिजे.

हलाल प्रमाणपत्रामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात येण्याची शक्यता ! – अमित चिमनानी, सनदी लेखापाल आणि संस्थापक, अखिल भारतीय हिंदु स्वाभिमान सेना

हलाल अर्थव्यवस्था अडीच ‘ट्रिलियन डॉलर’पर्यंत पोचली आहे. त्यातून त्यांनी हवे तसे बोलणारे, दाखवणारे आणि हवे तसे करणारे विकत घेतले आहेत. अमेरिकेची एक वाहिनी हलाल प्रमाणपत्राला प्रोत्साहित करत आहे. एकूणच स्थिती पहाता हलालमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात येण्याची शक्यता आहे.

हिंदूंची मंदिरे धर्मशिक्षणाची केंद्रे बनली पाहिजेत ! – मदन उपाध्याय, संस्थापक, मिशन सनातन

आपल्या धर्माचे संस्कार, परंपरा आणि ज्ञान लोकांपर्यंत पोचले पाहिजे. त्यासाठी आपली मंदिरे केवळ दर्शनस्थळे न ठेवता धर्मशिक्षण देणारी केंद्रे बनवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मंदिरांचे विश्वस्त आणि पुजारी यांचे प्रबोधन करून त्यांच्यात जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमाला विश्व हिंदु परिषदेचे धर्माचार्य संपर्क प्रमुख श्री. बी.के. ठाकूर सिंह महाराज, श्री. बी.के. वाधवानी, समाजसेवक श्री. योगेश सैनी, श्री. घनश्याम चौधरी, श्री. सच्चिदानंद उपासने, तसेच विविध सामाजिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे अनेक पदाधिकारी, धर्मप्रेमी अन् मान्यवर उपस्थित होते.

वैशिष्ट्यपूर्ण

याप्रसंगी पत्रकारितेच्या क्षेत्रात धर्मनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ राहून हिंदु धर्म अन् हिंदु समाज यांच्यासाठी उल्लेखनीय योगदानासाठी ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीचे छत्तीसगड राज्य ‘ब्यूरो चीफ’ श्री. योगेश मिश्र यांचा पू. अशोक पात्रीकर यांच्या हस्ते आणि हिंदूसंघटनासाठी विशेष योगदान दिल्याविषयी सनदी लेखापाल श्री. अमित चिमनानी यांचा पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

क्षणचित्रे

१. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अखिल भारतीय हिंदु स्वाभिमान सेनेचे संस्थापक तथा सनदी लेखापाल श्री. अमित चिमनानी यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
२. एकूणच कार्यक्रम पाहून पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज यांनी ‘असे आयोजन पुढील मासात नागपूरमधील शदाणी दरबार येथे करू’, असे सांगितले.
३. ‘अशा प्रकारचे आयोजन दुर्ग येथेही करू’, असे विश्व हिंदु परिषदेचे धर्माचार्य संपर्क प्रमुख श्री. बी.के. ठाकूर सिंह महाराज यांनी सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *