श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचे प्रकरण
मुंबई– श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे लिलावधारक आणि शासकीय अधिकारी यांच्यावर ‘सीआयडी’च्या अहवालानुसार तातडीने गुन्हे नोंद करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती, समविचारी संघटना यांच्यासमवेत भाविक आणि हिंदु धर्मप्रेमी यांच्या वतीने भांडुप (प.) रेल्वे स्थानकाजवळ १ जून या दिवशी ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’ करण्यात आले.
या वेळी घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेतही लोकांनी सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. आंदोलनात वारकरी संप्रदाय, बजरंग दल, वज्रदल, सनातन संस्था आदी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
‘या घोटाळ्यातील भष्टाचार्यांवर कारवाई होईपर्यंत राज्यभरात आंदोलने करण्यात येतील, तसेच भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा याविरोधात सनदशीर मार्गाने लढा चालूच राहील’, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली.