Menu Close

छत्तीसगडमध्ये इरफानकडून १८ वर्षीय हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह

प्रातिनिधिक छायाचित्र

बासना (छत्तीसगड) – येथे मिनू नावाच्या एका १८ वर्षीय हिंदु मुलीला इरफान याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला. इरफान हा विवाहित असून त्याला २ बायका आहेत. इरफान याने मीनूला इस्लाम स्वीकारण्यास, बुरखा घालण्यास आणि गोमांस खाण्यास भाग पाडले, अशी माहितीही पुढे आली आहे. सारंगगड येथील त्याच्या नातेवाइकांच्या घरातून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी इरफान याच्या पहिल्या पत्नीच्या आईने आरोप केला आहे की, इरफान याचे पूर्ण कुटुंब हिंदु मुलींना जाळ्यात ओढण्याचे काम करत आहे. इरफान याचे मामा आणि त्याच्या मावशीची मुले यांनीही हिंदु महिलांशी विवाह केला आहे. ‘इरफान याने विवाहाचे आमिष दाखवून या आधी खुशी यादव नावाच्या मुलीला जाळ्यात ओढले होते’, अशी माहिती इरफान याच्या पहिल्या पत्नीने दिली. ‘मुसलमान समाजाने त्याच्यावर बहिष्कार टाकावा आणि कायद्यानुसार त्याला शिक्षा होईल याची खात्री करावी’, अशी मागणी इरफान याच्या पहिल्या पत्नीने केली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *