Menu Close

काश्मीरमधून आतापर्यंत ३ सहस्रांहून अधिक हिंदूंचे पलायन !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांमुळे घाबरलेले काश्मिरी हिंदू आणि अन्य राज्यांतील हिंदु कर्मचारी यांनी १ जूनच्या रात्रीपासून पलायन चालू केले आहे. आतापर्यंत ३ सहस्रांहून अधिक हिंदूंनी काश्मीर खोरे सोडून जम्मूमध्ये पलायन केल्याचे वृत्त आहे. सहस्रो हिंदू काश्मीर सोडण्याच्या सिद्धतेत आहेत; मात्र प्रशासन त्यांना निवासस्थानाच्या बाहेर पडण्यास, तसेच प्रवास करण्यापासून रोखत असल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे. श्रीनगरच्या इंदिरानगर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने तेथील हिंदूंना बाहेर पडता येत नसल्याचे दिसून येत आहे. काश्मीर खोर्‍यात ८ सहस्र हिंदु कर्मचारी नियुक्त आहेत.

१. एका काश्मिरी हिंदू महिलेचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात ती म्हणत आहे, ‘आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून येथे रहात आहोत; मात्र आता जी स्थिती निर्माण झाली आहे ती पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे. यामुळे आम्ही सर्व सरकारी कर्मचार्‍यांनी निर्णय घेतला आहे की, काश्मीर खोरे साडून निघून जावे. आता हे सरकारवर अवलंबून आहे की, ते आम्हाला नोकरीवर ठेवणार कि नाही ?’

२. ‘कश्मीर मायनॉरिटी फोरम’ने सांगितले, ‘बँक व्यवस्थापक विजय कुमार यांच्या हत्येनंतर आम्ही सरकारच्या विरोधातील आंदोलन थांबवले आहे. आता आमच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नसल्याने आम्ही पलायन करण्यास चालू करत आहेत.’

काश्मिरी हिंदूंचा खीर (क्षीर) भवानी मेळ्यावर बहिष्कार

काश्मीर खोर्‍यातील गांदरबल जिल्ह्यातील तुलमुला येथे ८ जून या दिवशी खीर (क्षीर) भवानी मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे गेली २ वर्षे हा मेळा होऊ शकला नव्हता; मात्र आता याच्यावर काश्मिरी हिंदूंनी बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या हिंदूंच्या हत्यांच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *