Menu Close

आतंकवादी संघटनेशी संबंधित असलेल्या जुनैद महंमद याच्या धर्मांध साथीदारास काश्मीरमधून अटक

पुणे – लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र आतंकवाद विरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) दापोडीतून अटक केलेल्या जुनैद महंमद याच्या साथीदाराला काश्मीर येथून अटक केली. आफताब शाह असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून तो जुनैद आणि लष्कर-ए-तोयबा यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्या चौकशीत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. आतंकवादी कारवाया करण्यासाठी जुनैदला जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांनी पैसे पुरवल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मागील मासात जुनैदला अटक केल्यानंतर ए.टी.एस्.च्या पथकांनी स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने कारगिल, गंधरबल, श्रीनगर परिसरातील विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. त्यांनी श्रीनगरपासून २९१ कि.मी. अंतरावर असलेल्या किश्तवार येथून आफताबला कह्यात घेतले. आफताबला स्थानिक न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यास ३ दिवसांचा ‘ट्रान्झिट रिमांड’ संमत करून ए.टी.एस्.च्या कह्यात दिले. ए.टी.एस्.चे पथक त्याला घेऊन पुण्याकडे मार्गस्थ झाले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *