हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’द्वारे मागणी !
सातारा– श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचा सीआयडीचा अहवाल येऊन ५ वर्षे उलटली, तरी दोषींवर कारवाई होत नाही, याचा अर्थ काय ? दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख कार्यवाह अधिवक्ता दत्ता सणस यांनी केली.(अशी मागणी का करावी लागते ? सरकारच्या ते लक्षात येत नाही का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात) येथील राजवाडा परिसरातील गोलबाग येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. आंदोलनास विश्व हिंदु परिषदेचे सातारा शहरमंत्री जितेंद्र वाडेकर, हिंदु महासभेचे सातारा जिल्हा कोषाध्यक्ष उमेश गांधी, भाजपचे माजी सैनिक सातारा जिल्हाध्यक्ष कॅप्टन विजयकुमार मोरे, हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे, सौ. रूपा महाडिक आदी मान्यवर आणि धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी स्वत:चे मनोगत व्यक्त केले. आंदोलनाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कु. रविना शेंडे यांनी केले.
0 Comments